भोर (जिल्हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यान
भोर (जिल्हा पुणे) : लोकमान्य टिळक यांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला, तो उद्देशच आज विस्मृतीत गेला आहे. उत्सवाला आता गालबोट लागून चंगळवाद आणि भोगवाद असे स्वरूप प्राप्त झाले आहे. आताच्या काळात समाजामध्ये राष्ट्र आणि धर्म यांप्रती जागृती होईल, अशा कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वजीत चव्हाण यांनी ३ सप्टेंबर या दिवशी येथील मयुरेश गृहनिर्माण संस्थेमध्ये समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानामध्ये केले. या वेळी श्री. चव्हाण यांनी गणेशपूजा विधी, महत्त्व आणि शास्त्र, गणेशमूर्ती वहात्या पाण्यातच का विसर्जन करावी, मूर्तीदान अयोग्य का, आदर्श गणेशोत्सव याविषयीही मार्गदर्शन केले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री युवराज मगर, मनोज नाझीरकर यांसह २० हून अधिक महिला उपस्थित होत्या. या वेळी उपस्थितांकडून समितीच्या वतीने धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात