Menu Close

कृत्रिम तलावापेक्षा वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे ! – पंकज बागुल, हिंदु जनजागृती समिती

धुळे येथे शांतता समिती बैठक

dhule_shantata_samiti_baithak
डावीकडून समितीचा विषय मांडतांना श्री. पंकज बागुल, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, महापौर सौ. कल्पना महाले आणि जिल्हाधिकारी श्री. दिलीप पांढरपट्टे

धुळे : मागील २ वर्षांपूर्वी शासनाने कृत्रिम तलाव बनवला होता. त्यात बुडून एका हिंदूचा मृत्यू झाला. त्यामुळे कृत्रिम तलाव करू नयेत. हिंदु धर्मानुसार मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित केल्याने सात्त्विकता सर्वदूर पसरते आणि श्री गणेशाच्या कृपेनेच पाणीही वहात आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल यांनी गणेशोत्सव आणि बकरी ईद यांच्या पार्श्‍वभूमीवर धुळे जिल्हा शांतता समितीची बैठक २ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी श्री. दिलीप पांढरपट्टे, महापौर सौ. कल्पना महाले, उपमहापौर श्री. अन्सारी, जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्य एस्., अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुलवळे, फादर विल्सन, मौलवी शकील, म.ना. जोशी, भाजपचे श्री. हिरामण अप्पा गवळी, श्री. संजय शर्मा, शिवसेनेचे श्री. महेशभाऊ मिस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. मिलिंद मुंदडा उपस्थित होते.

शिवसेनेचे श्री. महेश मिस्त्री म्हणाले, “अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी अशी अनुमती कधीच मागावी लागत नाही. मग केवळ हिंदूंच्याच सणांच्या संदर्भात अशी बंधने का ? भारनियमनही केवळ हिंदूंच्याच सणांच्या कालावधीत केले जाते; पण अन्य वेळी का नाही ? बकरी ईदच्या नंतरही २० दिवस दुर्गंध येत असतो. प्रत्येक वेळी हिंदूंनीच का हे सहन करायचे ? शासन जरी आमचे असले, तरी अन्याय मात्र हिंदूंवर होणे, हे खेदजनक आहे. हिंदूंच्या सणांवरील निर्बंध काढले पाहिजेत.”

भाजपचे श्री. हिरामणअप्पा म्हणाले,”क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवण्यास प्रशासनाने सांगितले आहे; मात्र मंडळाला ते बसवणे शक्य नाही. प्रशासनानेच ते बसवावेत.”

बैठकीतील अन्य अनुभव

१. हिंदु आणि मुसलमान धर्म यांची समानता विशद करणारे हिंदूंचे घोर अज्ञान !

एका तथाकथित हिंदुत्वनिष्ठाने हिंदु आणि मुसलमान धर्म कसे समान आहेत, याविषयी सांगितले. ते म्हणाले, “शिवाने त्याचा मुलाचा शिरच्छेद केला. नंतर त्याला हत्तीचे डोके बसवण्यात आले, तसेच पैगंबरच्या मुलाचे मुंडके बकरीचे झाले. त्याचा बळी दिला; म्हणून श्री गणेशचतुर्थी आणि बकरी ईद समवेत येतात.”

२. एका मुसलमान नेते म्हणाले, “आतापर्यंत धुळ्यात श्री गणेशोत्सवात कधीही दंगल झाली नाही आणि यापुढेही होणार नाही.” (धुळे जिल्हा आणि परिसरात मुसलमान सातत्याने दंगली करून हिंदूंच्या जीवावर उठलेले असतात. २००८ मधील धुळे दंगल हिंदू कधीही विसरणार नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. एका मुसलमान नेत्याने विषयाच्या अगोदर कुराणातील वाक्य म्हणून बोलण्यास प्रारंभ केला. (किती हिंदू श्‍लोक म्हणून बोलण्यास प्रारंभ करतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. बैठक चालू असतांना नमाजाची वेळ झाल्यावर बरेचसे मुसलमान नेते नमाजासाठी निघून गेले. (हिंदूंनो, मुसलमानांचे धर्मप्रेम जाणा ! –
संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *