Menu Close

डॉ. तावडे यांना अधिवक्त्यांना भेटू न देण्याचा खुलासा न्यायालयाने पोलिसांकडे मागितला !

सनातनद्वेषापोटी न्यायालयाचा आदेशही न जुमानणार्‍या अन्वेषण यंत्रणा !

sanatan1

कोल्हापूर : सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अधिवक्त्यांना भेटू न देण्याचा खुलासा न्यायालयाने ५ सप्टेंबरला सायंकाळनंतर पोलिसांकडे मागितला. यासंदर्भात त्यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात अवमान अर्ज दाखल केला. ६ सप्टेंबर या दिवशी त्याची सुनावणी होईल.

३ सप्टेंबर या दिवशी जेव्हा डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या वेळी डॉ. तावडे यांची चौकशी होत असतांना त्यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना तेथे उपस्थित रहाण्यास न्यायालयाने अनुमती दिली होती. असे असतांना ४ सप्टेंबर या दिवशी एकदाही डॉ. तावडे यांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना भेटू दिले नाही. डॉ. तावडे यांना त्यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना का भेटू दिले जात नाही, याचे कोणतेही संयुक्तिक कारण पोलिसांनी दिले नाही. (न्यायालयाचा आदेश असूनही अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना भेटू न देणार्‍या पोलिसांवर वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या संदर्भात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी तो उचलला नाही. त्याच प्रकारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या संदर्भात सिद्ध केलेले आवेदनही कोल्हापूर पोलिसांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना हे निवेदन फॅक्स करावे लागले. त्याला तसेच इमेलला उत्तर न आल्याने नाईलाजाने अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी प्रथम वर्गन्यायदंडाधिकारी यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. त्यामुळे पोलिसांनी अधिवक्त्यांना का भेटू दिले नाही, याचा खुलासा न्यायालयाने पोलिसांकडे मागितला आहे.

अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी या वेळी पुढील मागणी केली. ते म्हणाले की, दोन दिवस अधिवक्त्यांना भेटू दिलेले नाही, त्यामुळे डॉ. तावडे यांना पुन्हा मारहाण झालेली असू शकते. त्यामुळे डॉ. तावडे यांना न्यायालयात पुन्हा हजर करावे आणि पुन्हा त्यांची शारीरिक आणि वैद्यकीय तपासणी करावी. यालाही पोलिसांनी उद्या उत्तर सादर करायचे आहे.

डॉ. तावडे यांच्याकडून नामजपाची माळ काढून घेतली !

पोलीस कोठडीत डॉ. तावडे हे जपाची माळ घेऊन नामजप करत होते. ही माळ पोलिसांनी काढून घेतली. वारंवार डॉ. तावडे यांनी विनंती केल्यावर पोलिसांनी ती माळ परत दिली. डॉ. तावडे नामजप करत असल्याने पोलिसांना तपासकामात अडचण होत होती, असे वृत्त काही दैनिकांनी प्रसिद्ध केले आहे. (वास्तविक देवतेचा नामजप करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. त्याच प्रकारे नामजप केल्याने तपास कामात कसाकाय अडथळा निर्माण होऊ शकतो ? अशाच प्रकारची वागणूक पोलिसांनी कधीही एखादा मुल्ला, फादर अथवा मौलवी यांना दिली असती का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *