‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चा उपक्रम
मुंबई : ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या वतीने ‘बिग ग्रीन’ गणेशा या कार्यक्रमात शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवणार्या ‘गणेश कला केंद्रा’चा २ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री गणेश कला केंद्राचे सर्वश्री प्रमोद बेंद्रे, विनोद बेंद्रे आणि चैतन्य तागडे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्र्यांसह अभिनेते जॅकी श्रॉफ, अन्नू कपूर, तसेच विशेष अथिती म्हणून पर्यावरण विभागाच्या सचिव श्रीमती मालिनी शंकर, सदस्य सचिव डॉ. पी. अन्बल्गन, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे-पाटील उपस्थित होते. प्रदूषण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी श्री. संजय भुस्कुटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या वेळी गणेश कला केंद्राच्या वतीने वितरीत करण्यात येणार्या गणेशमूर्ती प्रमुख पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात आल्या. सनातन संस्थेचे साधक मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी घडवलेल्या मूर्तींप्रमाणे केंद्राने या मूर्ती घडवल्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात