हे चित्र हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून देवतेचे केलेले विडंबन समाजावे, यासाठी छापण्यात आले आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी ! – संपादक, हिंदुजागृती
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका अभिनेत्याकडून ‘थँक गॉड बाप्पा…’ या गाण्याचा व्हिडिओ ‘यू ट्यूब’वर ठेवण्यात आला आहे. या गाण्यात केलेले श्री गणेशाचे मानवीकरण असे –
१. यात समाजातील स्वार्थी, भ्रष्टाचारी सामाजिक प्रवृत्तींचा उल्लेख करण्यात आला आहे, तसेच पोलिसांची केवळ स्वतःच्या क्षेत्रापुरते कार्य करण्याची असलेली संकुचित वृत्ती, लाच घेणे यांवर बोट ठेवण्यात आले आहे. ‘गणपति अशा व्यक्तींसारखा नसतो’, असा आशय या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. (देवात माणसाचे दुर्गण कसे असतील ? असे म्हणणे म्हणजे देव आणि माणसाला एका तराजूत तोलण्यासारखे आहे. धर्माचरण आणि साधना नसल्यामुळे सध्या अशा प्रकारे देवाचे मानवीकरण करून देवेचा अवमान केला जात आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) समाजातील अपप्रकारांविषयी प्रबोधन करणे, हा यामागील उद्देश असला, तरी धर्मशिक्षणाच्या अभावामुळे याचे सादरीकरण अयोग्य पद्धतीने केले आहे.
२. मानवीरूपातील श्री गणेश पाश्चात्त्य संगीताच्या तालावर नृत्य करत आहे, त्यामुळे त्याचे विडंबन झाले आहे.
३. विसर्जनानंतर गणेशमूर्तींची होणारी दु:स्थिती सांगितली असून असे सगळे असले, तरी ‘गणपति आपल्यावर रागावत नाही, पुढच्या वर्षी पुन्हा हसत येतो’, असे सांगितले आहे.
म्हणजे ‘आपण कितीही चुकलो, तरी देव क्षमा करतो’, असा चुकीचा संदेश समाजात जात आहे; मात्र गणेशोत्सवाचे बाजारीकरण केल्याने, तसेच श्री गणेशमूर्तींची विटंबना झाल्याने आपल्यावर श्री गणेशाची अवकृपाच होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाज मोठ्या प्रमाणात एकत्रित येत असल्याने लोकांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भात जागृती करण्याची मोठी संधी उपलब्ध होते. या संधीचा खर्या अर्थाने लाभ होण्यासाठी आणि वरीलप्रकारे केल्या जाणार्या अयोग्य निर्मिती टाळण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान वृद्धींगत करणे अपरिहार्य आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात