Menu Close

हिंदू स्वभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांचे प्रतिपादन, ‘हिंदूंनी त्यांच्या स्वरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक !’

गाझियाबाद येथे हिंदु नारी संसदेचे आयोजन

nari_sansad1

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : देशात ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या घटली, त्या ठिकाणी हिंदु महिलांना अधिक प्रमाणात अत्याचार सहन करावे लागते आहेत. मुसलमान स्वत: एक मतपेढीच्या स्वरूपात प्रस्थापित झाले आहेत. या मतपेढीसाठी आपले स्वार्थी नेते मुसलमानांच्या कृत्यांवर पडदा टाकण्यात मग्न आहेत. त्यामुळे आता हिंदूंनाच त्यांच्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदू स्वभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांनी हिंदु नारी संसदेत केले. येथील डासना देवी मंदिरामध्ये महिलांसाठी दोन दिवशीय हिंदु नारी संसद पार पडली. यात १५ राज्यांमधून आलेल्या महिलांनी भाग घेतला. या कार्यक्रमाला आध्यात्मिक गुरु मॉ कांचन गिरी, दक्षिण भारतातील चित्रपट अभिनेत्री प्राची अधिकारी, गोव्यातून कृतीका देसाई, महाराष्ट्रातून हिंदु जनजागृती समितीच्या क्षिप्रा जुवेकर, तमिळनाडूच्या सीता उत्थपन्न, देहलीच्या आरती जुनेजा आदींनी विचार मांडले.

nari_sansad

या वेळी आध्यात्मिक गुरु मॉ कांचन गिरी म्हणाल्या, आजच्या स्थितीत कन्या भ्रूणहत्या हा आपल्या समाजाला लागलेला फार मोठा कलंक आहे. त्याला मुळापासून नष्ट केले पाहिजे. दक्षिण भारतातील चित्रपट अभिनेत्री प्राची अधिकारी म्हणाल्या, दक्षिण भारतातही हिंदु महिलांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. जेथे मुसलमान संघटना अत्यंत सुनियोजितपणे लव्ह जिहादच्या नावावर हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत आणि अतिशय जलदपणे त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत. या नारी संसदेत केंद्र सरकारकडे मुलींना सैन्य प्रशिक्षण देण्याची मागणी करण्यात आली. ज्यामुळे वेळ पडल्यास त्या स्वत: चे रक्षण स्वत: करू शकतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *