हे आधीच का केले नाही ? त्यासाठी हिंदूंना मागणी का करावी लागते ?
पुणे : सर्व घाटांवर विद्युत् दिवे, संरक्षक कठडे बसवणे, घाटावर जाण्यासाठी चांगला रस्ता करणे, कर्मचार्यांकडून भाविकांना कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याविषयी कोणत्याही प्रकारचा दबाव न आणणे, प्रत्येक घाटावर सुरक्षारक्षक घाटाच्या किनारी भाविकांचे संरक्षण करण्यासाठी थांबणे, अशा प्रकारचे आदेश देण्यात येतील. या सर्व गोष्टी येत्या २४ घंट्यांमध्ये पूर्ण करू, असे आश्वासन पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाला दिले.
या वेळी अधिवक्ता देवदास शिंदे, अधिवक्ता चंद्रकांत भोसले, श्री. शैलेंद्र दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे श्री. पराग गोखले आदी उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या घाटांवरील अव्यवस्था आणि गलथान कारभार यांच्या विरोधातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी आयुक्तांनी कसबापेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी खिलारे आणि घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांना तात्काळ संपर्क साधून २४ घंट्यांमध्ये उपरोक्त गोष्टींवर कारवाई करून ती कामे पूर्ण झाल्याचा लेखी तपशील स्वतःकडे मागवला आहे.
हिंदुत्वनिष्ठांनी कुणाल कुमार यांच्या लक्षात आणून दिले की, कृत्रिम हौदावर श्रीगणेशमूर्ती हौदातच विसर्जन करा ! असे लिहिले असून त्यातील हौदातच या शब्दातील च हा शब्द काढावा. त्यामुळे ते बंधनकारक केले जात आहे. त्यावर कुणाल कुमार यांनी च अक्षर काढण्यास सांगतो, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात