-
हिंदु जनजागृती समितीच्या कृतीशील निषेधाचा परिणाम !
-
हिंदूंनो, या यशाविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या pmc care या ट्विटर खात्यावरून वाहतूक नियमांच्या संदर्भात नागरिकांचे प्रबोधन करणार्या विज्ञापनाच्या चित्रामध्ये श्री गणेशाचे विडंबन करण्यात आले होते. या संदर्भात दैनिक सनातन प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महापालिकेच्या pmc careचे राहुल जगताप यांना संपर्क साधून सदर विडंबनात्मक विज्ञापन तातडीने हटवण्याची मागणी केली होती, तसेच विज्ञापन काढले न गेल्यास धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कायदेशीर मार्ग अवलंबण्याची चेतावणी दिली होती. त्यानंतर जगताप यांनी ते चित्र काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सदर विडंबनात्मक विज्ञापन पुणे महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावरून हटवल्याचे आढळून आले. (हिंदूंनो, या यशाविषयी श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! अन्यत्र आढळून येणारे श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने कृतीशील व्हा ! श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखणे ही एक प्रकारे देवतेची उपासनाच आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या संदर्भात pmc care चे राहुल जगताप यांच्याशी दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराने संपर्क साधला असता ते उडवाउडवीची उत्तर देत होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विरोध करणारे चुकीच्या दृष्टीने पहातात. खरेतर या चित्रांमध्ये विडंबन असे काही नाही; पण तरीही सदर चित्र हटवण्याचे तोंडी आदेश दिले आहेत, असेे सांगितले. (कोणत्याही देवतेला त्याचे मूळ रूप सोडून अन्य स्वरूपात रेखाटणे अथवा देवतेचे मानवीकरण करणे हे विडंबनच आहे. आपली कल्पकता दाखवण्याचे देवता हे माध्यम नाही. धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंच्या धर्मभावना बोथट झाल्यानेच त्यांच्याकडून अशा विडंबनाच्या कृती होतात. सर्वांना धर्मशिक्षण देणे, हाच असे विडंबन थांबवण्याचा प्रभावी पर्याय आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पुणे महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावरून गणरायाचे विडंबन
(हे चित्र कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी प्रसिद्ध केले नसून केवळ विडंबन काय आहे, हे समजावे यासाठी प्रसिद्ध केले आहे.)
- हिंदूंनो, विज्ञापनातून होणारे श्री गणेशाचे विडंबन थांबवा !
- गणरायाला दाखवले हेल्मेट वापराचा संदेश देताना !
- गणेशभक्त असप्रसन्न
पुणे : गणेशविसर्जनासाठी धर्मविरोधी पर्यायांचा पुरस्कार करणार्या पुणे महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावरून pmc care अंतर्गत श्री गणरायाचे विडंबन केले आहे. महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावरून वाहतुकीचे नियमपालन करण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्याच्या नावाखाली गणरायाला हातात हेल्मेट धरून वाहतूक पोलिसाप्रमाणे संदेश देतांना दाखवले आहे. (श्री गणेशाचे मानवीकरण करून विज्ञापनासाठी उपयोग करणे, हे त्याचे विडंबनच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात, दैनिक सनातन प्रभात)
या विज्ञापनात आरे भक्ता तुझ्या डोक्याची काळजी घे. प्रत्येक जण माझ्यासारखा नशीबवान नसतो दुसरे डोके मिलायला … असे वाक्य श्री गणेशाच्या तोंडी दाखवण्यात घातले आहे. (धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे विज्ञापनासाठी उपयोग केला जातो. हिंदूंनो, सनदशीर मार्गाने या विडंबनाचा निषेध नोंदवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात, दैनिक सनातन प्रभात)
या चित्रामुळे गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून हे चित्र तातडीने हटवण्याची मागणी केली जात आहे.
गणरायाचे विडंबन करण्याचा महानगरपालिकेने ठेका घेतला आहे का ? – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
पुणे महानगरपालिकेने गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या संदर्भात धर्मविरोधी निर्णय घेऊन गणेशभक्तांच्या धर्मभावना पायडळी तुडवल्या. पुणे महानगरपालिकेने सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून गणरायचे विडंबन करून श्री गणेशाचा अनादर केला आहे. गणरायाचे विडंबन करण्याचा महानगरपालिकेने ठेका घेतला आहे का, अशीच शंका येते. गणरायाचे विडंबनात्मक चित्र महानगरपालिकेने त्वरित हटवून गणेशभक्तांची क्षमा मागावी. हे चित्र न हटवल्यास महानगरपालिकेच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात