Menu Close

मुसलमान, ख्रिस्ती आणि सुशिक्षित पुरोगामी हेच देशाचे खरे शत्रू ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

pu_sambhajirao_bhide_guruji

सातारा : सध्या देव, देश अन् धर्म यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या सर्वाला देशातील शिक्षणपद्धती कारणीभूत आहे. भारतीयही पाश्‍चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानत असून प्रत्येक जण स्वार्थांध झाला आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था पूर्वीप्रमाणे देश पोसणारी राहिली नाही. त्यामुळे आपली संस्कृती, आचार-विचार लयाला चालले आहेत. शिवछत्रपतींना सर्वधर्मसमभावी ठरवू पहाणारे मुसलमान, ख्रिस्ती आणि सुशिक्षित पुरोगामी हेच देशाचे खरे शत्रू आहेत, असा घणाघात पू. संभाजीराव भिडे यांनी केला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि लिंब ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,

१. मुसलमान कितीही चांगला असला, तरी तो प्रथम मुसलमान असतो आणि नंतर देशाचा नागरिक असतो.

२. महाराष्ट्र ही साधू-संत-महंत यांची भूमी असून त्यांनी यामागेही देशाला तारले आहे आणि आताही तेच देशाला तारत आहेत. विरक्तपणाचा परमोच्च बिंदू म्हणजे महाराष्ट्रातील संत होत. या साधू-संतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव केला होता; मात्र आताची सुशिक्षित पुरोगामी आणि कपाळ-करंटी धेंडे संतांनाही नावे ठेवायला मागे-पुढे पहात नाहीत.

३. विश्वामध्ये एकूण १८७ राष्ट्रे आहेत. त्यातील हिंदुस्थान हे एकमेव राष्ट्र असे आहे की, ज्याच्यावर ७६ देशांनी राज्य केले आहे. आजही भारतियांना पारतंत्र्यात रहाण्याची लाज वाटत नाही. हिंदी-चिनी भाई-भाई म्हणणार्‍या गांधींमुळे देशाचे वाटोळे झाले. चीन आणि पाकिस्तान का माजलेत ? कारण हिंदू षंढ आहेत.

४. शिवछत्रपती हे सर्वधर्मसमभावी कदापी नव्हते, तर ते प्रखर हिंदु धर्माभिमानी होते. राजकारणासाठी आपापल्या सोयीनुसार प्रत्येक जण त्यांच्या नावाचा गैरवापर करून घेत आहे. कुणी मते मागत आहे, तर कोणी पैसे गोळा करत आहे. शिवछत्रपतींनी मंदिरांच्या ठिकाणी असलेली प्रत्येक मशीद जमिनदोस्त करून तेथे मंदिर बांधल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात.

५. आपणही तरुणांच्या हातात आता शिवचरित्र देणार आहोत. नवरात्रात आपण दुर्गादौड काढणार आहोत. दुर्गादौडमध्ये सहभागी होऊन देव, देश अन् धर्मासाठी लढण्याची शक्ती आई तुळजाभवानीच्या चरणी मागूया.

कार्यक्रमाचा प्रारंभ ध्येयमंत्राने तर शेवट प्रेरणामंत्राने झाला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. आेंकार डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील २ सहस्रांहून अधिक तरुणांनी घेतला.

क्षणचित्रे : 

१. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत, भगवे झेंडे फडकवत तरुण वर्ग ५०-१०० च्या जथ्थ्याने सभेमध्ये सहभागी होत होता.

२. सभेच्या मार्गावर आणि सभास्थळी भगवे झेंडे लावल्याने संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. सायंकाळी ७.३० वाजता प्रारंभ झालेला कार्यक्रम रात्री ९.३० पर्यंत चालू होता; मात्र एकही तरुण आबालवृद्ध जागेवरून हालला नाही.

आतापर्यंत लिंब हे गाव काँग्रेसच्या विचारांनी प्रभावित होते. तेथे निर्विवाद काँग्रेसची सत्ता होती; मात्र काही वर्षांपासून तेथील हिंदु जागृत होऊन संघटितपणे अन्यायाचा प्रतिकार करू लागत आहे. लव्ह जिहादचे प्रकरण असो, धर्मांतराचे प्रकार असो, हिंदूंच्या सण, उत्सवावरील बंधने असो याविषयी लिंबवासीय जागृत आणि संघटित होत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर ज्या चौकात सभा होणार होती, त्या चौकाचे नाव अगदी सभा घेईपर्यंत गांधी चौक असे होते; मात्र श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने या चौकाला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, असे नाव देण्यात आले. तसेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या शुभहस्ते या फलकाचे अनावरणही करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *