नाशिक : गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार, पारंपरिक पद्धतीने आणि वहात्या पाण्यातच विसर्जन झाले पाहिजेे. तुमच्या मोहिमेला माझा पाठिंबा आहे. मी तुमच्या सोबत आहे. या गोष्टीचा अधिकाधिक प्रसार झाला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब सानप यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले पाहिजे, असे आवाहन करा, अशा आशयाचे निवेदन आमदार श्री. बाळासाहेब सानप यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी आमदार श्री. सानप यांनी ते निवेदन आयुक्तांना पाठवण्याच्या सूचना कार्यालयीन कर्मचार्यांनाही दिल्या. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यानी गणेशोत्सवात होणारे अपप्रकार आणि वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जनाचे शास्त्र याविषयी माहिती दिली, तसेच या मोहिमेला नाशिकमध्ये मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादाविषयी त्यांना अवगत करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. रवींद्र सोनईकर, श्री. अनिल पाटील, श्री. शैलेश पोटे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात