Menu Close

धर्मप्रेमी सनातनच्या साधकांचा छळ थांबवा ! – ट्विटरवर धर्मप्रेमींची एकमुखी मागणी

सनातनवरील आरोपांमधील फोलपणा सिद्ध करणार्‍या ट्विट्स लक्षावधी लोकांपर्यंत पोचल्या !

trending-on-twitter८ सप्टेंबर २०१६ या दिवशी ट्विटर वर चालू असलेल्या ट्रेंडमध्ये सनातनच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सहभाग घेऊन संस्थेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. या प्रकरणात सनातनची सत्य बाजू समाजासमोर मांडण्यात आली.

१. सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अटकेप्रकरणी Virendra Singh Tawade हा ट्रेंड चालू होता. या माध्यमातून डॉ. तावडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमधील फोलपणा सिद्ध करणार्‍या ट्विट्स करण्यात आल्या. हा विषय १ कोटी ३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोचला.

२. Kolhapur या नावाने चालू असलेल्या ट्रेंडद्वारे ८८ लाखांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचवण्यात आला.

३. #AntiHinduPolice या ट्रेंडमध्ये सनातनवर पोलिसांकडून होत असलेल्या छळाचे ट्विट्सद्वारे कथन करण्यात आले. हा विषय दीड लाखांहून अधिक लोकांपर्यंत गेला.

सनातनविरोधी षड्यंत्राला वाचा फोडणारे ट्विटरवरील अभिप्राय !

प्रसारमाध्यमांतून डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ. वीरेंद्र तावडे यांच्याविषयीची, तसेच सनातनविरोधी वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर सनातनने आपली बाजू मांडण्यासाठी आणि विपरीत वृत्तांचे खंडण करण्यासाठी सनातन संस्थेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून (@sanatansanstha) प्रसार केला जात आहे. याला समाजातील धर्मप्रेमी लोकांनी सनातनच्या समर्थनार्थ दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आम्ही वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

१. सनातनच्या साधकांना छळणार्‍या उत्तरदायी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी – श्री. संजय

२. सनातन संस्थेला खोट्या आरोपांखाली गोवण्याचे हे षड्यंत्र म्हणजे अन्यायच आहे. – श्री. भूपेश शर्मा

३. हिंदूविरोधी शक्तींच्या विरोधात सरकार इतके सुस्त का आहे ? सगळ्या हिंदूंनी एकजुटीने सनातनच्या समर्थनार्थ एकत्र यायला हवे. – श्री. विजय मालपाणी

४. धर्मप्रेमी सनातनच्या साधकांचा छळ थांबवा ! – विनुता

५. पोलिसांनी सनातनचा कितीही छळ केला, तरी त्यांच्या पाठीशी ईश्‍वरी अधिष्ठान असल्याने शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. – अमोल कुळकर्णी

६. सनातनला अपकीर्त करण्याचे हिंदूविरोधी षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. – श्री. जितेंद्र सिंह

७. एका राष्ट्रप्रेमी ट्विटर खात्यावर सनातन संस्थेवर पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी लावण्यात आलेल्या आरोपांविषयी जनतेचे मत घेण्यात आले. यामध्ये ९९ प्रतिशत लोकांनी हे हिंदूविरोधी षड्यंत्र आणि प्रशासनाची निष्क्रियता असल्याचे मत व्यक्त केले. – जनता की आवाज

८. अन्य हिंदुत्ववादी संघटनांना हा चिंतेचा विषय, तसेच धोक्याची घंटा असल्याने वेळीच संघटित होण्याचे आवाहन केले. – एक धर्मप्रेमी
प्रतिकूल काळात सनातनच्या पाठीशी उभे रहाणार्‍या धर्मप्रेमी हिंदूंचे आभार !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *