Menu Close

भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार मूर्ती विसर्जन करू देऊ ! – नगरपालिका मुख्याधिकारी

gadhinglaj_ganeshvisarjan_nivedan
गडहिंग्लज येथे निवेदन स्वीकारतांना उजवीकडून मुख्याधिकारी श्री. तानाजी नराळे आणि निवेदन देतांना हिंदु संघटनांचे प्रतिनिधी

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) : येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी श्री. तानाजी नराळे आणि नायब तहसिलदार श्री. बी.टी. पाटील यांना मूर्तीदानाऐवजी मूर्तीविसर्जन करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. तानाजी नराळे म्हणाले, “आम्ही केवळ शासनाच्या सूचनांचे पालन करतो. तुम्ही सांगितलेली सर्व सूत्रे योग्य आहेत. त्या सूचनांची आम्ही प्रशासकीय बैठकीत चर्चा करू. आमचा कोणताही कर्मचारी दान घेण्यासंदर्भात कोणालाही सांगणार नाही. लोकांना त्यांच्या इच्छेने विसर्जन करू देत.”

या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. दिलीप माने, शहरप्रमुख श्री. सागर कुराडे, शहरप्रमुख श्री. मनोज पवार, युवासेनाप्रमुख श्री. प्रतिक क्षीरसागर, श्री. काशीनाथ गडकरी, श्री. संतोष लोहार, जयशिवा कलकुटकी तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *