हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनाचा परिणाम !
पुणे : येथील सर्व विसर्जन घाटांवर संरक्षक कठडे नसणे, घाटावर जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध नसणे आदी असुविधांविषयी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने ८ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेतली, तसेच पालिका अधिकार्यांवर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे तक्रारही प्रविष्ट केली होती, तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांना भेटून निवेदनही दिले होते. तसेच कृत्रिम हौदावर श्री गणेशमूर्ती हौदातच विसर्जन करा ! असे लिहिले असून त्यातील हौदातच या शब्दातील च हा शब्द काढण्याविषयीही सुचवले होते. त्याचाच परिणाम म्हणून उपरोक्त असुविधांचे पालट कसबा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पालट करण्यात आले. हे पालट केल्याचे क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अरुण खिलारे यांनी भ्रमणभाष करून समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांना कळवले आणि प्रत्यक्ष येऊन पहाण्यास सांगितले. (हिंदूंनो, मिळालेल्या या यशाविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात