पुणे : सनातन संस्थेचे कार्य चांगले असून ते समाजाला उपयुक्त आहे. आज समाजात सात्त्विकता हवी असून ती देण्यासाठी सनातन संस्थेची आवश्यकता आहे. समाजाने अशा चैतन्यदायी प्रदर्शनाचा लाभ घेऊन धर्माचरणाची कास धरावी. त्यासाठी सनातन संस्थेचे मार्गदर्शन घ्यावे, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक आणि कसबा-विश्राम प्रभाग समिती अध्यक्ष श्री. दिलीप काळोखे यांनी केले. येथील बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोर सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून महर्षींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चैतन्यदायी धर्मरथ ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. काळोखे यांनी धर्मरथपूजन आणि श्रीफळ वाढवून केले. या वेळी श्री. काळोखे यांनी संपूर्ण प्रदर्शन सनातनचे साधक श्री. शिरीष शहा यांच्याकडून जिज्ञासेने जाणून घेतले आणि काही ग्रंथ, सात्त्विक उत्पादनेही खरेदी केली.
सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथ ग्रंथ प्रदर्शन हे ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.
या प्रदर्शनात काय पहाल ?
- श्री गणेशपूजनामागील शास्त्रविषयक फलक
- धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स फलक
- सनातनची विविध सात्त्विक उत्पादने, राष्ट्र आणि धर्म विषयक ग्रंथ, देवतांची छायाचित्रे आणि नामपट्ट्या
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात