Menu Close

आदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे अंबरनाथच्या नगराध्यक्षांना निवेदन

ambernath_ganeshustav_nivedan
निवेदन स्वीकारतांना नगराध्यक्ष कु. प्रज्ञा बनसोडे (उजवीकडे)

अंबरनाथ : कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन, श्री गणेशमूर्तींचे दान यांसारख्या धर्मशास्त्रविरोधी प्रथा आणि गणेशोत्सवातील अपप्रकार रोखून आदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ सप्टेंबर या दिवशी अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कु. प्रज्ञा बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी समितीच्या वतीने अधिवक्ता (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी नगराध्यक्षा कु. प्रज्ञा बनसोडे यांना आदर्श गणेशोत्सवाविषयी माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *