Menu Close

(म्हणे) माझ्यावर आघात म्हणजे भारतीय मुसलमानांवर आघात ! – डॉ. झाकीर नाईक यांची धमकी

  • डॉ. झाकीर नाईक म्हणजे पाकमध्ये लपलेला दाऊद नाही, तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला वेळ का लागत आहे, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उठत आहे !
  • वलयांकित मुसलमान आरोपींचे नेहमीचे तुणतुणे !

zakir_naik

नवी देहली : इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर बंदी घालण्यात आली, तर ती २० कोटी भारतीय मुसलमानांवरील अन्याय असेल, अशी धमकी आतंकवाद्यांचे आदर्श ठरलेले डॉ. झाकीर नाईक यांनी दिली आहे. माझ्यावरील कोणत्याही प्रकारचा आघात हा भारतीय मुसलमानांवरील आघात असेल, अशीही धमकी त्यांनी दिली आहे.

भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या नावे लिहिलेल्या खुल्या पत्रातून डॉ. झाकीर यांनी ही धमकी दिली आहे. यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी असा कोणताही गुन्हा केलेला नाही, तरी मला देशाच्या शत्रूप्रमाणे सादर केले जात आहे आणि माझ्या अनुपस्थितीत माझ्या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *