नंदूरबार : येथील हुतात्मा शिरीषकमार यांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शिरीषकुमार मेहेता, शशिधर केतकर, लालदास शाह, धनसूखलाल वाणी आणि घनशामदास शाह हे बालक्रांतिकारक हुतात्मा झाले. त्यांच्या बलीदानाला ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने हे वर्ष अमृतस्मृती वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने हुतात्मा शिरीषकुमार याचे टिळक रोडवरील तत्कालीन निवासस्थान स्मारक घोषित करून पाचही बालक्रांतिकारांच्या स्मृतींना उजाळा द्यावा.
या निवेदनातील अन्य मागण्या
१. तेथे त्यांच्या प्रतिमा आणि माहितीपट कायमस्वरुपी लावावेत.
२. पाचही हुतात्म्यांचे अर्धपुतळे तेथे स्थापन करावेत.
३. ९ ते १५ सप्टेंबर हुतात्मा सप्ताह साजरा केला जावा.
हे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जय बजरंग व्यायामशाळेचे अध्यक्ष शेखर मराठे, हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे नरेंद्र तांबोळी, तसेच डॉ. नटावदकर, भावना कदम, सौ. भारती पंडित, सौ.छायाताई सोनार, सौ. रजनी आव्हाड, आकाश गावित हे उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांच्या वतीने तहसीलदार प्रमोद शेले यांनी निवेदन स्वीकारले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात