- बंगाल भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ?
- बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणार्या सरकारने बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे !
- हिंदूंना तालिबानी ठरवणारे पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ? कुठे आहेत प्रसारमाध्यमे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
रामचंद्रपूर (दक्षिण २४ परगणा जिल्हा, बंगाल) : पशूंचा व्यापार करणार्या रौफ लासकर नावाच्या धर्मांधाची व्यावसायिक वैरातून ४ सप्टेंबर या दिवशी हत्या झाली होती. धर्मांधांनी या हत्येचा आरोप येथील हिंदूंवर ठेवला आहे. धर्मांधांनी रामचंद्रपूर, बेनेपारा, मंदिरताला, निश्चिंतपूर आणि जुमाई लासकर बाजार येथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. तसेच रामचंद्रपूर येथील पोलीस ठाण्याला आग लावून भस्मसात केले. त्यात पोलीस ठाण्यातील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आणि पोलिसांना पळ काढावा लागला. तसेच १३ सप्टेंबर या दिवशी होणार्या बकरी ईदला पशूंच्या कुर्बानीनंतर हिंदूंची कुर्बानी देऊ, अशी चेतावणी धर्मांधांनी दिली आहे.
धर्मांधांनी रामचन्द्रपूर येथील हिंदूंच्या दुकानांवर आक्रमण करून त्यांना ते बंद करण्यास भाग पाडलेे. धर्मांधांच्या धमकीला घाबरून अनेक हिंदूंनी गाव सोडून इतरत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. या धमकीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांनी हिंदूंच्या सुरक्षेसाठी काहीच पावले उचलली नाहीत.
हा भाग मुसलमानबहुल असून तेथील सर्व मुसलमान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे सदस्य आहेत. तर हिंदू भाजप आणि कम्युनिस्ट पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे पोलिसांना मुसलमानांविरोधात कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उलट पोलीस रौफ लासकर याच्या हत्येचे अन्वेषणही हिंदूंची चौकशी करूनच करत आहेत. या अन्यायाविरुद्ध हिंदूंनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना पत्र लिहून वस्तूस्थिती कळवली आणि न्याय देण्याची विनंती केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात