Menu Close

आदर्श घोटाळ्यातील आरोपी अन् काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून इसिस आणि सनातन यांची तुलना !

(म्हणे) इसिसप्रमाणेच सनातन संस्था घातक !

सनातन इसिसप्रमाणे आतंकवादी असती, तर अशोक चव्हाण असे वक्तव्य तरी करू शकले असते का ? एवढ्या उघडपणे ते सनातनच्या विरोधात गरळओक करू शकतात, यातूनच सनातन इसिसप्रमाणे घातक नाही, हे सिद्ध होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ashok_chavan

परभणी : देशात इसिस या आतंकवादी संघटनेप्रमाणेच सनातन संस्था घातक आहे. ही काँग्रेसची भूमिका असून सनातन संस्थेवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. परभणी येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. (काँग्रेसने देशासाठी केलेल्या अनन्वित राष्ट्रद्रोहाचा हिशोब केला, तर काँग्रेसवर १०० वेळा बंदी घातली तरी ती अल्पच ठरेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *