Menu Close

सनी लिओनच्या अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालण्याची मागणी !

वाराणसीमध्ये राष्ट्रीय आंदोलन

वाराणसी : अभिनयाच्या नावाखाली अश्‍लीलता पसरवणार्‍या कॅनडास्थित सनी लिओन हिच्या संकेतस्थळावर बंदी घालणे, काश्मीरमध्ये देशद्रोह्यांकडून गो इंडिया, गो बॅकच्या घोषणा देणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आदी मागण्यांच्या संदर्भात, तसेच पंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतीश कुमार प्रधान यांना खोट्या आरोपांखाली अटक करण्याच्या निषेधार्थ १० सप्टेंबरला वाराणसी येथील शास्त्रीघाट, वरुणापुलाजवळ राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना जिल्ह्याधिकार्‍यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

या आंदोलनामध्ये हिंदु युवा वाहिनी, अध्यात्म न्यास समिती, भारत विकास परिषद, होप फाऊंडेशन, इंडिया विथ विजडम्, हिंदु युवा शक्ती संघटन, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता श्री. अरुणकुमार मौर्या आदी मान्यवरही यात सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *