भाविकांनो, तुम्ही भक्तीभावाने पूजा केलेल्या श्री गणेशमूर्तींची अशा विटंबना करणार्या नगरपरिषदेस जाब विचारा !
कुरुंदवाड : कुरुंदवाड येथे १० सप्टेंबर या दिवशी भाविकांकडून एका राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांकडून श्री गणेशमूर्तींचे दान घेण्यात येत होते. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. उमेश लंबे यांनी ही गोष्ट त्या पक्षाच्या प्रमुखांना लक्षात आणून दिली. त्या वेळी त्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना “असा काही प्रकार चालू आहे, हे माहितीच नाही”, असे सांगितले. यानंतर त्या प्रमुखांनी त्या महिला कार्यकर्त्यांना दूरभाष करेपर्यंत त्या निघून गेल्या होत्या.
या महिला कार्यकर्त्या निघून गेल्यावर नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती अत्यंत खराब पाणी असलेल्या खंदकात विसर्जित केल्या. या वेळी डॉ. लंबे यांनी मुख्याधिकार्यांना दूरभाषद्वारे संपर्क केल्यावर, “त्यांनी आता शेवटच्या क्षणी काही करू शकत नाही”, असे उत्तर दिले. प्रत्यक्षात ४ दिवसांपूर्वीच मुख्याधिकारी मुतकेकर यांना ‘श्री गणेशमूर्तीदान नको, तर वहात्या पाण्यातच विसर्जनच करावे ‘ या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उमेश लंबे, सौ. स्मिता कानडे, श्री. कुमार माळी आणि श्री. सुनील साळुंखे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात