मुंबई : १२ सप्टेंबर २०१६ या दिवशी दैनिक लोकसत्तामध्ये डॉ. झाकीर नाईक आणि आठवले हे एकाच माळेचे मणी असे अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलेले वक्तव्य कोणतीही शहानिशा न करता प्रसिद्ध करण्यात आले. तसेच आदर्श घोटाळ्यातील आरोपी आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सनातन संस्थेची इसिसशी तुलना करणारे वक्तव्य केले, ते देखील लोकसत्तामध्ये छापण्यात आले आहे. या बातम्यांचा निषेध म्हणून धर्मप्रेमी हिंदूंनी #BoycottLoksatta या नावाने ट्विटरवर ट्रेंड केला. या ट्रेंडमध्ये हिंदूंनी सनातनच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देऊन लोकसत्ताचे संपादकांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात यावा आणि लोकसत्तावर बहिष्कार घालावा, अशी मागणी ट्विटद्वारे केली. #BoycottLoksatta या ट्रेंडद्वारे हा विषय १ लक्ष ८९ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोेचला आहे.
वाचकांसाठी ट्विटरवरील काही ठळक प्रतिक्रिया खाली देत आहोत.
१. दैनिक लोकसत्ता नेहमीच सनातनविरोधी बातम्यांसाठी हपापलेली असते. हिंदुत्वाला नष्ट करण्याचे त्यांचे षड्यंत्र असते. – श्री. सुनील
२. केवळ टीआरपी मिळवण्यासाठी लोकसत्ताने हे खोटे वृत्त प्रसिद्ध केले आहे. – श्री. प्रदीप शर्मा
३. एका धर्मप्रेमीने मी लोकसत्ताचा वाचक आहे; पण हे वृत्त वाचून उद्यापासूनच मी हा दैनिक बंद करणार आहे, असे सांगितले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपकीर्ती करणार्या दैनिक लोकसत्ताचा निषेध. – एक धर्मप्रेमी
५. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी झटणारे संत आणि साधक यांना लक्ष्य करण्यापेक्षा अतिरेक्यांकडे लक्ष द्या. – वसु
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात