संघटित हिंदूंचे यश !
मुंबई : सीसका हे प्रकाशयोजना करणारे आस्थापन आहे. ५ सप्टेंबर २०१६ या दिवशी त्यांनी स्वतःच्या उत्पादनांचे विज्ञापन ट्विटरवर प्रसिद्ध केले. या विज्ञापनामध्ये विविध प्रकारच्या दिव्यांची रचना करून गणपतीसारखा आकार साकारण्यात आला आहे आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाला धर्मशास्त्रापेक्षा विसंगत रूपात दाखवून एकप्रकारे त्याचे विडंबनच करण्यात आले आहे. यामुळे सर्व हिंदूंनी याचा निषेध केला. त्यांनी सीसका आस्थापनाच्या या विज्ञापनाच्या ट्विटला उत्तर (रिप्लाय) देत त्यांना हे विज्ञापन मागे घेण्याची मागणी केली. याचा परिणाम म्हणजे आस्थापनाने विज्ञापनाची ही ट्वीट त्यांच्या ट्वीटर खात्यावरून काढून टाकली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात