Menu Close

हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना कारागृहात एकांतवासात ठेवून छळ होत असल्याची तक्रार !

हिंदूंचा छळ आणि जिहादी आतंकवाद्यांना सूट अशीच सध्याची लोकशाही झाली आहे !

dhananjay_desai

पुणे : वर्ष २०१४ मध्ये फेसबूकवर छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाचा मजकूर प्रकाशित झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीत शेख नावाच्या व्यक्तीची २ जून या दिवशी हत्या झाल्याच्या प्रकरणी हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख श्री. धनंजय देसाई यांना ९ जून २०१४ या दिवशी अटक करण्यात आली. तेव्हापासून ते येरवडा कारागृहात बंदिस्त आहेत. या काळात त्यांना अंडा सेलमध्ये एकटे ठेवून त्यांचा छळ करण्यात आला, अशी तक्रार श्री. देसाई यांनी मोक्का न्यायालयाला केली आहे. तसेच कारागृहाचे कर्मचारी त्यांना शिवीगाळ करतात, असेही या तक्रारीत म्हटले आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश उत्पात यांनी या अर्जाची दखल घेऊन २२ सप्टेंबर २०१६ या दिवशी सुनावणी ठेवली आहे.

श्री. धनंजय देसाई यांचे अधिवक्ता श्री. मिलिंद पवार म्हणाले की, गेल्या सुनावणीच्या वेळी श्री. देसाई यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी आणि त्यांना योग्य औषधे मिळत नसल्याची तक्रार न्यायालयात केली होती. तेव्हा न्यायालयाने पोलिसांना आणि कारागृह व्यवस्थापनाला श्री. देसाई यांना वैद्यकीय साहाय्य देण्याचे आदेश दिले होते; मात्र हे आदेश धाब्यावर बसवण्यात आले. तसेच कारागृहाचे कर्मचारी त्यांना शिवीगाळ करतात, असेही अधिवक्ता पवार म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *