दैनंदिन जीवनातील आवश्यक असे धर्माचरणाचे महत्त्व समजले ! – जिज्ञासूंची प्रतिक्रिया
सांगली : येथील जुन्या ग्रामपंचायतीजवळ असलेल्या जय जवान गणेशोत्सव मंडळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे धर्मशिक्षण देणार्या आणि क्रांतीकारकांची माहिती देणार्या ५८ फ्लेक्सचे प्रदर्शन ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत लावण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहून जिज्ञासूंनी, आम्ही आजपर्यंत केवळ कृती करत होतो; मात्र प्रदर्शन पाहून दैनंदिन जीवनातील आवश्यक असे धर्माचरणाचे महत्त्व समजले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नृसिंहवाडी येथे कन्यागत पर्वकाळात हे प्रदर्शन पाहिले होते. त्या वेळी अशाच प्रकारे प्रदर्शन त्यांच्या गावात लावण्याची मागणी त्यांनी केली होती.
या प्रदर्शनाचा ६०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप साळोखे यांनी प्रदर्शन पाहून अन्य गोष्टींना फाटा देऊन एक चांगला उपक्रम राबवल्याविषयी मंडळातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. हे प्रदर्शन लावण्यात जय जवान गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश घुले, उपाध्यक्ष संजय वाले, गणेश तेली, विक्रम सूर्यवंशी यांसह अन्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. (धर्माचरणाचे महत्त्व लक्षात आल्यावर त्वरित कृती करून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन लावणार्या जय जवान गणेशोत्सव मंडळातील सर्वांचे अभिनंदन ! प्रत्येक हिंदूंनी याप्रमाणे कृतीशील होत धर्मकार्यातील आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात