‘अंधेरीचा राजा’ गणेशोत्सव मंडळाचा आदर्श निर्णय
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ‘अंधेरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने धर्माला अनुसरून आदर्श निर्णय घेतला आहे. मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्या महिलांना, तसेच हाफ पॅन्ट घालून येणार्या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. (अशा प्रकारे समाजात बोकाळलेल्या पाश्चात्त्य संस्कृतीला आळा बसवण्यासाठी अंधेरीच्या राजा मंडळाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहेच, तसेच यामुळे मंडपातील पावित्र्यही टिकून रहाणार आहे, असे निर्णय अन्य मंडळे ज्या दिवशी घेतील तो सुदिन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
‘अंधेरीचा राजा’च्या कमानीबाहेर तसा फलकच लावण्यात आला आहे. हा फलक सध्या मुंबईत चर्चेचा विषय बनला आहे. महिलांनी किमान सलवार कमीज, साडी अशा वेशातच, तर पुरुषांना पूर्ण पॅन्टमध्ये गणेशाचे दर्शन घ्यावे, असेही या फलकातून सांगण्यात आले आहे. या निर्णयाला काही भाविकांनी विरोध केला; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. विरोधाची धार मावळल्यानंतर भक्तांनीही आता राजीखुशीने अंधेरीच्या राजाच्या मंडळाचा हा निर्णय मान्य केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात