Menu Close

इसिस आणि सनातन यांच्यामध्ये हमीद दाभोलकर यांना काहीच फरक दिसत नाही, कारण त्यांच्या बुद्धीची झेपच तेवढी आहे !

अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या वक्तव्यावर नेटिझन्सने (संकेतस्थळावरून) घेतला खरपूस समाचार !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यास उशीर झाला; पण आता आरोपपत्र प्रविष्ट होणे, हे तपासाला योग्य दिशेने नेणारे पाऊल म्हणता येईल. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी सरकारने आपली भूमिका आतातरी स्पष्ट करावी, असे वक्तव्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावर संकेतस्थळावर नेटिझन्सने घेतलेला खरपूस समाचार वाचकांसाठी येथे देत आहोत.

हमीद यांच्या बुद्धीची झेपच तेवढी आहे ! – किरण

आपल्या बुद्धीला झेपेल एवढेच बोलावे बरं का ? नाहीतर हसे होते. कारण हमीदला इसिस आणि सनातनमध्ये काहीच फरक दिसत नाही. त्याच्या बुद्धीची झेपच तेवढी आहे, तर तो तरी काय करणार ?

अंनिसमधील एखाद्या कार्यकर्त्याने गुन्हा केला, तर अंनिसवर बंदी आणणार का ? – रावसाहेब

हमीदभाऊ अपप्रवृत्ती या सगळ्या संघटनांत असतात. समजा, उद्या अंनिसमधील एखाद्या कार्यकर्त्याने गुन्हा केला, तर अंनिसवर बंदी आणणार का ? त्याप्रमाणे सनातनवर जरी बंदी आणली, तरी ती न्यायालयात टिकेल का ? हा प्रश्र आपल्या ज्ञानी अधिवक्त्यांना विचारा आणि मग असल्या मागण्या करा.

अंनिसला सर्वसामान्य हिंदूंचा पाठिंबा नाही ! – धनंजय

सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया या अंनिसविरुद्ध आहेत. यावरून सर्वसामान्य हिंदूंचा अंनिसला पाठिंबा नक्कीच दिसत नाही.

सनातनवर बंदी घालण्यापूर्वी शिखांच्या हत्येसाठी आधी काँग्रेसवर बंदी घालावी लागेल ! – योगेश

सनातनचे साधक सापडले; म्हणून सनातनवर बंदी येऊ शकत नाही. त्यासाठी पूर्ण संघटनाच या मानसिकतेत काम करते, हे सिद्ध करावे लागेल.

हमीद यांच्या मागणीनुसार सनातनवर बंदी घालण्यापूर्वी त्याच न्यायाने शिखांच्या हत्येसाठी आधी काँग्रेसवर बंदी घालावी लागेल.

अंनिसने आता मुस्लिम, ख्रिश्‍चन आणि इतर धर्मातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हाती घ्यावे ! – अनिल प्रभाकर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समतोल राखण्यासाठी आता मुस्लिम, ख्रिश्‍चन आणि इतर धर्मांतील अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हाती घ्यावे अन्यथा फक्त एकच धर्म सुधारला जाईल आणि इतर धर्म अंधकारातच रहातील. त्यामुळे अंनिसवर अंधश्रद्धा निर्मूलनांतही भेदभाव केल्याचा आरोप लागेल.

एक वेळ इसिसवर कारवाई होईल; पण सनातनवर होणार नाही ! – एक वाचक

हमीद जाणूनबुजून इस्लाम आणि ख्रिश्‍चन धर्मातील अंधश्रद्धा निर्मूलन करत नाहीत ! – अनिल

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *