Menu Close

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक !

  • गोळीबारात पुण्याचे भाजपचे नगरसेवक घायाळ
  • पोलिसांसह १५ नागरिक घायाळ
  • अपुर्‍या पोलीस बळामुळे गोंधळ

हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक व्हायला हा भारत आहे कि पाक ?
ईदच्या वेळी गोरक्षकांना नाहक तडीपार करणारे पोलीस हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांना तडीपारीच्या नोटिसा कधी बजावतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ganesh_visarjan
प्रतिकात्मक चित्र

उमरखेड : अनंतचतुर्दशीच्या दिवशी येथील शिवाजी वॉर्ड परिसरातील छावा गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक शहरातील रोहिलीपुरा या भागात आल्यावर मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. यात तीन पोलिसांसह १५ भाविक घायाळ झाले. (हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक कोण करतात, हे उघड असतांना पोलीस आवश्यक तो बंदोबस्त का करत नाहीत ? हिंदूंनो, सुरक्षित मिरवणुकांसाठी पोलिसांवर अवलंबून न रहाता आता हिंदूंनीच संरक्षककडे उभारण्याला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी पोलीस बंदोबस्त अपुरा असल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी अश्रूधुराच्या दोन नळकांड्या फोडल्या; मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. त्याच वेळी आलेल्या पावसामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उमरखेडला भेट दिली. दगडफेक झाल्याचे कळताच शहरातील अन्य गणेशोत्सव मंडळांनी काही काळ मिरवणुका जागेवरच थांबवल्या होत्या.

उत्सवकाळात धर्मांधांची वाढती उद्दामगिरी !

जुन्नर (जिल्हा पुणे) येथेही धर्मांधांकडून दगडफेक

जुन्नर : येथील सदाबाजारमध्ये १४ सप्टेंबर या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या आदल्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास माही मोहल्ल्यामधून काही धर्मांधांनी दगडफेक केली.

हे वृत्त गावात पसरले असता अनेक हिंदू या मोहल्ल्याजवळ जमा झाले होते. तसेच पोलीसही मोठ्या संख्येने जमा झाले होते. या वेळी पोलिसांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक चालू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. (हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी धर्मांधांनी दंगल घडवायची आणि हिंदूंना मात्र शांत रहाण्याचे आवाहन करायचे, हाच पोलिसांचा न्याय का ? दंगल घडवण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही, असा धाक पोलीस कधी निर्माण करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

या प्रकरणी पोलिसांनी १५ सप्टेंबर या दिवशी रात्रीपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा प्रविष्ट केला नव्हता तसेच कोणालाही अटक केलेली नव्हती. (निरपराध हिंदूंना नाहक अनेक वर्षे कारागृहात डांबणारे पोलीस मात्र दंगलखोर धर्मांधांवर साधा गुन्हाही नोंदवत नाहीत. असे पोलीस हिंदूंना न्याय काय देणार ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

मुंबई आणि पुणे येथे गणेशोत्सव मंडळांच्या अनेक घंट्यांच्या विसर्जन मिरवणुका !

मुंबईत लालबागच्या राजाची मिरवणूक २१ घंटे चालली, तर पुण्यातील मिरवणुका २८ घंट्यांहून अधिक वेळ चालू होत्या. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडीही झाली. १७ सप्टेंबरला हे विसर्जन पूर्ण झाले.

पुण्यात सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे !

१. गोळीबारात भाजपचे नगरसेवक घायाळ

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत कँटोन्मेंट बोर्ड येथील भाजपचे नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळीबार झाला. यात श्री. यादव यांच्या तोंडाला गोळी घासून गेल्याने ते घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले. (अशा प्रकारे उघडपणे गोळीबाराच्या घटना घडत असतील, तर विसर्जन मिरवणुकीच्या सुरक्षिततेसाठी सहस्रोंच्या संख्येने पोलीस तैनात करून काय उपयोग ? केवळ अधिक संख्याबळाची नव्हे, तर कुशल, निर्णयक्षम आणि तत्पर पोलिसांची आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. पोलीस हवालदाराला मारहाण

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अलका चित्रपटगृह परिसरात पोलीस हवालदार विजयकुमार पाटणे यांना मारहाण होण्याची घटना घडली. चौकात गर्दी नियंत्रित करत असतांना झालेल्या वादाच्या वेळी तीन युवकांनी हवालदार पाटणे यांना मारहाण केली. या वेळी ते मागे लावलेल्या बॅरिकेट्सवर पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अन्य दोघे पळून गेले आहेत.

३. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी १ सहस्रांहून अधिक भ्रमणभाषची चोरी

पुण्यात विसर्जनाच्या दिवशी बेलबाग चौक ते अलका चौक या परिसरात १ सहस्रांहून अधिक भ्रमणभाष चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या. या प्रकरणी दोघांना अटक झाली असून आतापर्यंत केवळ २० भ्रमणभाष परत मिळाले आहेत.

विसर्जनाच्या वेळी राज्यात विविध घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण बेपत्ता आहेत.

१. नाशिक जिल्ह्यात ७ जणांना जीव गमवावा लागला. त्यांपैकी सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील तलावात लष्करातील जवान संदीप शिरसाट यांच्यासह अन्य एक जण वाहून गेला.

२. वर्धा जिल्ह्यात श्री गणेशमूर्तीसमवेत सेल्फी काढतांना (भ्रमणभाषमधून स्वतःचे छायाचित्र स्वतः काढतांना) नदीच्या पात्रात पडून तिघे वाहून गेले.

३. वाळूंजमध्ये परमेश्‍वर शेंगुळे या शिक्षकाचा विसर्जनाच्या वेळी गोदावरीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला, तर नांदेड पालिकेच्या कर्मचार्‍याला एका दुर्घटनेत प्राणास मुकावे लागले.

४. जळगावमधील कांग नदीत दोन तरुण वाहून गेले.

५. नागपुरात छावणी भागात महाप्रसाद कोठे ठेवायचा यावरून झालेल्या वादात एका तरुणीचा नाहक बळी गेला.

६. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत एकाला हृदयविकाराचा झटका आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *