Menu Close

कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाकडून हिंदु युवतीची एकतर्फी प्रेमातून गळा चिरून हत्या !

Lovejihad_girl

कोइम्बतूर : तमिळनाडूच्या कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाने एकतर्फी प्रेमात आलेल्या अपयशाने २३ वर्षीय तरुणी एस्. धान्या हिची तिच्याच घरात घुसून गळा कापून निर्घृण हत्या केली. ती घरात एकटीच असताना झहीर तिच्या घरात मागील दरवाज्यातून घुसला. त्याने धान्या हिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. धान्याने विरोध करताच झहीरने धान्यावर तीक्ष्ण हत्याराने आक्रमण केले.

गेल्या ३ महिन्यांतील अशा प्रकारे घडलेली ही चौथी घटना आहे. घटनेनंतर झहीरने विष प्राशन केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. एस्. धान्या हिचा साखरपुडा नुकताच झाला होता. ती खाजगी आस्थापनात नोकरी करत होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *