सोलापूर : येथील मानाच्या आजोबा गणपति मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नऊवारी साडी आणि फेटा परिधान करून हातात काठ्या, तसेच महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारे आणि महिलांमध्ये आत्मविश्वास जागवणारे लिखाण असलेले फलक धरले होते. या रणरागिणी मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरल्या. मिरवणूक पहाण्यासाठी आलेल्या जिज्ञासूंनी फ्लेक्सवरील संपर्क क्रमांक लिहून घेतला. मिरवणुकीदरम्यान रणरागिणी देत असलेल्या घोषणांमध्ये जिज्ञासूही सहभागी झाले होते. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी महिलांनी संघटित होण्याचा संदेश रणरागिणी शाखेच्या माध्यमातून देण्यात आला.
क्षणचित्रे :
१. समाजातील अनेक जण रणरागिणी शाखेने काढलेल्या या फेरीचे चित्रीकरण करत होते.
२. एका महिला पोलिसांनी तुम्ही परिधान केलेला पारंपरिक पोशाख खूपच चांगला आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
३. रणरागिणी उत्स्फूर्तपणे देत असलेल्या घोषणांकडे समाजातील जिज्ञासूंचे लक्ष आपोआप वेधले जात होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात