स्वतःचे दायित्व पुजार्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करणारे हिमाचल प्रदेशचे काँग्रेस सरकार !
शिमला : हिमाचल प्रदेशातील अनेक गावांतील पुजार्यांना सरकाकडून बंदूक बाळगण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात मंदिरांच्या पुजार्यांच्या हत्या करून प्राचीन मूर्ती आणि मौल्यवान वस्तू यांची चोरी झाल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या १० वर्षांत १५० हून अधिक मंदिर आणि मठ लुटण्यात आले. डिसेंबर २०१४ मध्ये रघुनाथ मंदिरात भगवान रघुनाथाच्या अमूल्य मूर्तीची चोरी झाली होती. राज्यातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने असतात. सरकार प्रत्येक मंदिराला सुरक्षा देऊ शकत नसल्याने सरकारने मंदिरात सीसीटीव्ही लावण्याचा आणि पुजार्यांना बंदुकांची अनुज्ञप्ती देण्याचा निर्णय घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात