भारतात अशी शपथ किती हिंदु लोकप्रतिनिधी घेतात ?
नवी देहली : भारतीय वंशाचे जितेश गढीया यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये भारताचा प्राचीन वैदिक ग्रंथ ऋग्वेदावर हात ठेवून शपथ घेतली. (जितेश गढीया यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ते हाऊस ऑफ लॉर्डसमधील सर्वांत अल्प वयाचे सदस्य आहेत. ब्रिटीश संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात मूळ भारतीय वंशाचे २० सदस्य आहेत. ब्रिटनच्या संसदेत नव्या सदस्यांना शपथ घेतांना बायबल व्यतिरिक्त दुसर्या एका धार्मिक ग्रंथाची निवड करण्याची अनुमती असते. यापूर्वी कधी कुणीही ऋग्वेदची निवड केली नव्हती. गढीया हे संसदेला ऋग्वेदाची १६७ वर्षे जुनी प्रत भेट म्हणून देणार आहेत. ही प्रत १८४९ मध्ये जर्मन शिक्षक डॉ. मॅक्सम्युलर यांनी संपादित आणि प्रकाशित केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात