Menu Close

दैनिक लोकमतचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा

lokmat12रामनाथी (गोवा) :  सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या समाजातील वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा नावलौकिक ठाऊक असतांना संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक यांनी सनातनी नव्हे ! विकृत ! या मथळ्याखाली मानहानीकारक लेख लिहून पणजी, गोवा येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या १९ जून २०१६ या दिवशीच्या अंकाच्या हॅलो रविवार पुरवणीत प्रसिद्ध करून सनातनची मानहानी केली. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक, मालक लोकमत मिडिया प्रा. लि., मुद्रक आणि प्रकाशक बालाजी मुळे यांना १४ जुलै २०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु त्यांनी या कायदेशीर नोटिशीतील संस्थेच्या मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. गजानन नाईक, अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते, अधिवक्त्या कु. दीपा तिवाडी आणि अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत दैनिक लोकमतचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपये मागणीचा दिवाणी दावा फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *