मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याविषयी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पालिकेच्या निर्णयाच्या विरोधात कुर्ला येथील मन्सूर अन्सारी यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर १६ सप्टेंबर या दिवशी मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर आणि न्यायमूर्ती एम.एस्. सोनक यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा प्रकार असून तो आरोग्यासाठी उपकारक आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार या नावाकडे न पहाता त्यातून मिळणार्या लाभांकडे पहायला हवे, असेही मत न्यायालयाने या वेळी व्यक्त केले. (आज संपूर्ण जगाने योगाभ्यासाचे लाभ आणि महत्त्व जाणले आहे. असे असतांना भारतातच त्याला अशा प्रकारे विरोध करणे हा कर्मदरिद्रीपणा आहे. हिंदुद्वेषातून सूर्यनमस्काराला विरोध करणार्यांनी खुशाल हिंदुस्थानाच्या बाहेरचा रस्ता धरावा ! – संपादक) २ आठवड्यांनंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात