Menu Close

सोलापूर येथे तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या मूर्तीदान मोहिमेचा फज्जा !

हिंदु जनजागृती समितीच्या गणेशमूर्ती विर्सजन मोहिमेस समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

ganesh-Murtiche-chitra-ghene

सोलापूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ सप्टेंबर या दिवशी राबवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्‍वर तलावावर भाविक श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आल्यावर काही महाविद्यालयीन तरुणांनी त्यांना मूर्तीदानाचा आग्रह केला. समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनानंतर भाविकांनी मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यासच प्राधान्य दिले. या वेळी महानगरपालिकेचे कर्मचारी कचर्‍याच्या गाडीतून निर्माल्य वाहून नेत होते. माजी नगरसेवक श्री. बापू ढगे यांनी प्रखर विरोध करून निर्माल्य अन्य वाहनांमधून नेण्यास भाग पाडले. (धर्मरक्षणासाठी तत्पर असणारे श्री. बापू ढगे यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मूर्तीदान मोहिमेला प्रतिसाद मिळत नसल्याने पर्यावरणवादी संभाजी तलावाकडे गेले. समितीचे कार्यकर्ते आणि बापू ढगे यांनी खडसावल्यावर त्यांनी त्यांची मोहीम थांबवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *