Menu Close

ठाणे जिल्ह्यात आदर्श गणेशोत्सव मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद !

सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रबोधन !

ganeshutsav_320
(वर्तुळात) मंडळाने मंडपात लावलेल्या सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्ट्या

ठाणे : जिल्ह्यातील शाळांमध्ये, घरोघरी, तसेच गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा यांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले होते. नगरसेविका अधिवक्ता सौ. रत्नप्रभा पाटील यांनी जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हापरिषदेच्या शाळा क्र. १३ (खोपट) आणि शाळा क्र. ४१ (उथळसर) या २ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कल्याण

कल्याण पश्‍चिम येथे १० ठिकाणी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? या संदर्भात प्रवचने घेण्यात आली. या वेळी भाविकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रवचन ऐकून मोठ्या प्रमाणात भाविकांनी सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने विकत घेतली, तसेच त्यांची मागणीही केली.

क्षणचित्रे

१. उषा दर्शन सोसायटी, गणेश चौक येथील दैनिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. भारांबे यांनी प्रवचनापूर्वी वातावरणशुद्धीसाठी सनातनची उदबत्ती लावून ठेवली होती. तसेच हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची संकेतस्थळे जिज्ञासूंना पहाता यावीत, या हेतूने चालू करून ठेवली होती. प्रवचनानंतर दोन दिवसांनी संपर्क केला असता सनातन प्रभातचे तीन नवीन वाचक झाले. सौ. भारांबे यांनी पितृपक्षाविषयीही विषय मांडण्यास बोलावले आहे.

२. एका घरी प्रवचन घेत असतांना बिया घालून बनवलेली गणेशमूर्ती अंगणात विसर्जन केल्यावर तिच्यातून रोपटे उगवते या संदर्भात एक ध्वनीचित्रफीत प्रसारित होत होती. ही धर्महानी असल्याचे लक्षात आल्याने या प्रवचनात धर्मशास्त्र सांगून प्रबोधन करण्यात आले.

३. राधानगर खडकपाडा येथील एका प्रवचानात अशा प्रकारची प्रवचन प्रत्येक सणाला घ्या, अशी मागणी केली.

४. ठाणकरपाडा येथील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळात प्रवचन ऐकून अशा प्रवचनांची सध्या पुष्कळ आवश्यकता आहे, असे उपस्थित महिलांनी सांगितले. पुढील वर्षी मंडळातील उपक्रमांत योग्य त्या सुधारणा करू, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

५. दोन ठिकाणी विषय मांडणार्‍या साधकांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

डोंबिवली

१. डोंबिवली (प.) येथे मूर्तीकारकांच्या येथून मूर्ती घेणार्‍या भाविकांमध्ये वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करणे का आवश्यक आहे ? याविषयी सनातनच्या साधिका सौ. मंगला क्षत्रिय यांंनी प्रबोधन केले.

२. डोंबिवली (प.) येथील अचानक मित्र मंडळाच्या अध्यक्षांनी सनातनच्या साधकांकडून मंडपाची शुद्धी करून घेतली आणि मंडपात चारही बाजूला नामपट्ट्या लावल्या होत्या.

बदलापूर

पनवेल ग्रुप उत्सव समितीच्या वतीने १२ सप्टेंबरला सनातन संस्थेच्या सौ. सुनंदा जोशी यांनी आदर्श गणेशोत्सवाविषयी मार्गदर्शन केले.

अंबरनाथ

येथील नगरपरिषदेमध्ये १४ सप्टेंबर या दिवशी हळदी-कुंकू कार्यक्रमात गणेशोत्सव शास्त्रानुसार साजरा करण्याचे महत्त्व, तसेच उत्सवातील अपप्रकार यांविषयी प्रबोधन करण्यात आले. ४० महिलांनी याचा लाभ घेतला. या वेळी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *