Menu Close

पापस्तानला नेस्तनाबूत करा ! : जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांची मोदी शासनाकडे मागणी

जळगाव : उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ जळगाव येथे स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने १९ सप्टेंबरला मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात शिवसेना, हिंदु महासभा, वकील संघ, सार्वजनिक गणेश महामंडळ, शिवगंध ढोल पथकातील महिला, महिला आघाडी, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. दीपक गुप्ता, सामाजिक कार्य करणारे श्री. दीपक जोशी, श्री. नारायण अग्रवाल आदींनी सहभाग घेतला होता.

शिवतीर्थापासून आरंभ झालेल्या या मोर्च्याची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाली. या वेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. बार बार गद्दारी भारत सह जाता है, ज्यादा संयम भी तो कायरता कहलाता है !, और कितनी चुडीया टुटेगी, क्या इसी तरह पुरी सेना मिटेगी !, मोदीजी हमारी सेना को छत्रपती शिवाजी महाराज की आन है, भारतीय सेना हमारी शान है !, युद्ध करा, युद्ध करा, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी युद्ध करा !, नष्ट करा, नष्ट करा, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी पाकिस्तानला नष्ट करा !, अशा घोषणा असलेले वैशिष्ट्यपूर्ण फलक हिंदुत्वनिष्ठांनी हातात धरले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *