अकलूज येथील सुजयनगर गणेश मंडळाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन
अकलूज : गर्दीच्या ठिकाणी होणारी छेडछाड, तसेच उत्सवांतील अपप्रकार किंवा लव्ह जिहाद यांसारख्या घटना असोत, महिलांनी त्यांचा विरोध करायला शिकले पाहिजे. महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर या इतिहासातील वीरांगनांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी, असे मत रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता दीक्षित यांनी व्यक्त केले. सुजयनगर गणेश मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम होणे, तसेच धर्माचरण करणे ही काळाची आवश्यकता आहे. प्रत्येक स्त्रीने चूल आणि मूल यांतून वेळ काढून बाहेरच्या जगात घडणार्या घटनांकडे डोळसपणे पहायला शिकले पाहिजे. या वेळी सुजयनगर गणेश मंडळाच्या वतीने सौ. दीक्षित यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला १५० जणांची उपस्थिती होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात