हिंगलाज मातेचे मंदिर महत्त्वाच्या ५१ शक्तिपिठांपैकी एक
नवी देहली : बलुचिस्तानमधील मुसलमान ५१ शक्तिपिठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेची पूजा करतात. हिंगलाज मातेचे मंदिर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानी लेखक तारक फतह यांच्या मते पाकिस्तानी सत्ताधिशांनी अनेक वेळा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु बलुच लोकांनी प्राणपणाने या मंदिराचे रक्षण केले आहे. हिंगलाज मातेचे मंदिर कराचीच्या पश्चिमेस २५० किलोमीटर लांब हिंगोल नदीच्या किनार्यावर आहे. ही देवी पांडव आणि क्षत्रिय यांची कुलदेवता आहे. येथे प्रतीवर्षी २२ एप्रिल या दिवशी मोठी यात्रा भरते. या ठिकाणी पाकिस्तानातील थरपारकर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने हिंदू तेथे दर्शनाला जातात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात