सरकारी धन ख्रिस्ती संस्थांना देणे, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. अशी उधळपट्टी किती दिवस चालू देणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामैय्या सरकारने ख्रिस्ती संस्थांना कोट्यवधी रुपये दिल्याचे समोर आले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती आणि सुशोभिकरण, तसेच ख्रिस्ती समाजाचे सभागृह यांच्या नावावर देण्यात आले. माहिती अधिकाराच्या अंतर्गत कर्नाटक सरकारला संबंधित माहिती विचारण्यात आली होती.
भारत धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे कोणतेही सरकार धार्मिक संस्थांना आर्थिक साहाय्य करू शकत नाही. त्यामुळे हे राज्यघटनेचे उल्लंघन असल्याचे म्हटले जाते. (कर्नाटक शासन ख्रिस्ती संस्थांच्या तुंबड्या भरण्याचे काम काँग्रेस अध्यक्षांच्या सांगण्यावरून करत आहे का ? याची चौकशी झाली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात