Menu Close

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे होणारे श्री गणेशाचे विडंबन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर रोखले गेले !

हिंदूंनो, या यशाविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !

विजयवाडा : येथे एका तयार कपड्यांच्या दुकानातील शोकेसमध्ये ठेवण्यात आलेल्या पुतळ्याला श्री गणेशाचा मुखवटा आणि वेष घालण्यात आला होता. यामुळे श्रीगणेशाचा अवमान होऊन लाखो गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. चंद्र मोगेर आणि सौ. तेजस्वी यांनी दुकानदाराचे प्रबोधन केल्यावर सदर दुकानाच्या मालकाने पुतळ्याला घातलेला गणपतीचा वेष त्वरित काढून टाकला. (श्री गणेशाचे विडंबन रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणारे श्री. चंद्र मोगेर आणि सौ. तेजस्वी यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *