Menu Close

अक्षरधाम मंदिर हल्ल्याप्रकरणी निर्दोष सुटलेला चांद खान गोहत्येप्रकरणी पुन्हा तुरूंगात

chand_khan
चांद खान

अक्षरधाम (गुजरात) : गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर २००२ साली झालेल्या हल्ल्याप्रकरणी ११ वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली चांद खान उर्फ शान खानला निर्दोष सोडले होते. परंतु यावेळी तो गोहत्येच्या आरोपाखाली तुरूंगात आहे. अक्षरधाम हल्ल्याप्रकरणी २००६ साली कनिष्ठ न्यायालयाने चांद खानला दोषी धरत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम ठेवली होती. मे २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. गुजरातमधील साबरमती तुरूंगातून बाहेर येऊन तो उत्तर प्रदेशातील बरेली येथे आपल्या कुटुंबीयांबरोबर राहू लागला. परंतु तो पुन्हा जून महिन्यापासून पिलीभीत तुरूंगात आहे. पिलीभीत येथील बिसलपूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गोहत्ये कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

नवाडिया सितारगंज येथे कारमधून ५०० किलो गो मांस घेऊन जाताना शान खान याच्यासह अतिक आणि फैजान या त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानेच आपले नाव शान खान असून अक्षरधाम मंदिर हल्ल्याप्रकरणी आपण अटकेत होतो याची माहिती दिली. पोलिसांनी चांद व शान खान या एकच व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.

 

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *