हिंदूंच्या जिवावर उठलेले धर्मांध ! हिंदूंनो, तुमच्या नेत्यांच्या रक्षणासाठी हिंदूसंघटनाविना पर्याय नाही !
हिंदु नेत्याच्या ऐवजी एखाद्या अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्याच्या गाडीला आग लावण्यात आली असती, तर एव्हाना संपूर्ण ‘धर्मनिरपेक्ष’ भारताने ‘देश असहिष्णू झाला आहे. येथील अल्पसंख्यांक असुरक्षित झाले आहेत’, अशी आरोळी ठोकायला आरंभ केला असता. आता मात्र कोणी काहीच बोलत नाही. त्यामुळे हिंदूंना त्यांच्याच देशात सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचे हे आणखी एक ढळढळीत उदाहरण आहे. ही स्थिती पालटण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राची अर्थात् सनातन धर्म राज्याची स्थापना करणे, हा एकमेव उपाय आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चेन्नई : हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष) या संघटनेचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांचे चारचाकी वाहन धर्मांधांनी पेटवून दिल्याची घटना तमिळनाडू राज्याच्या दिंडीगल शहरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (यातून पोलिसांचा हिंदुद्वेषच दिसून येतो ! अल्पसंख्यांकांवरील आक्रमणांच्या घटनांच्या अन्वेषणात पोलीस अशी दिरंगाई कधीही दाखवत नाहीत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. श्री. संपथ यांनी हिंदु मक्कल कत्छीचे कार्यकर्ते श्री. धर्मा यांना त्यांचे ‘क्वालिस’ हे चारचाकी वाहन धर्मकार्यासाठी वापरण्यास दिले होते.
२. गणेशोत्सव विसर्जनाच्या काळात पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास धर्मांधांनी हे वाहन पेट्रोल टाकून पेटवून दिले.
३. धर्मांध गाडी पेटवण्यासाठी घटनास्थळापासून जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतांनाचे ‘फूटेज’ सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाले आहे.
४. पोलीस सर्व पुराव्यांसहित घटनेचे अन्वेषण करत असले तरी, त्यांनी आतापर्यंत कोणत्याही धर्मांधाला अटक केलेली नाही.
५. श्री. धर्मा यांच्यावर यापूर्वीही फकरुद्दीन नावाच्या धर्मांधाकडून आक्रमण करण्यात आले होते. त्या आक्रमणातून धर्मा बचावले होते. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. तेव्हा फकरुद्दीनला अटक करण्यात आली होती, परंतु तो सध्या जामिनावर आहे. (गाडी पेटवण्याच्या गुन्ह्यामध्ये फकरुद्दीनच्या सहभागाविषयीशी शक्यता नाकारून चालणार नाही. अशा वेळी त्याची चौकशी करण्यास पोलीस दिरंगाई का करत आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात