कोलंबो (श्रीलंका) : योगामुळे हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग, फुफ्फुसाचे विकार यांसारख्या व्याधींवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी येथे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिणपूर्व आशियाच्या ६९ व्या परिषदेत योगवर्गाला संबोधित करतांना ते बोलत होते.
नड्डा पुढे म्हणाले, आपल्या अयोग्य जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या व्याधींवरही योगाद्वारे नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. आपले शरीर हे मंदिर असेल, तर योगामुळे ते मंदिर सुंदर बनते. योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून ती एक शिस्तबद्ध आणि आदर्श जीवन जगण्याची पद्धत आहे. योगामुळे ध्यानावस्था प्राप्त होते आणि आत्मशक्ती जागृत होते. (एकीकडे योगातून ॐ वगळायचे आणि दुसरीकडे योगामुळे ध्यानावस्था प्राप्त होते, असेही म्हणायचे. याला काय म्हणावे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी नड्डा यांनी जागतिक आरोग्य क्षेत्राविषयी भारताचा दृष्टीकोन स्पष्ट केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात