काश्मीरमधील उरी येथे आतंकवाद्यांनी आक्रमण केल्याप्रकरणी निषेध आंदोलन
नेवासा : पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर आक्रमण करण्यात आले होते. याचा निषेध म्हणून नेवासा येथील बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांनी एकत्रितपणे पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. आंदोलनाच्या वेळी आक्रमणामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांनाही उपस्थित हिंदुत्ववाद्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी हिंदुत्ववाद्यांच्या वतीने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि तहसीलदार नामदेव टिळेकर यांना निवेदन देण्यात आले. पाकिस्तान नेहमीच आतंकवाद्यांना पाठीशी घालत असल्याचे माहिती असल्याने केंद्रशासनाने या अतिरेकी कारवाया हाणून पाडाव्यात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी सैनिकांना धडक कारवाईचे आदेश द्यावेत, असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी बजरंग दलाचे श्री. संतोष पंडुरे, भाजपचे श्री. संदीप आलवने, सर्वश्री राजू उपाध्ये, हरिभाऊ शेजुळ, संतोष कुटे, महेश क्षीरसागर, उपेश उपाध्ये, विलास गरुड, कैलास कुंढारे, बाबासाहेब कुंढारे, सोनू जाधव शिवाजी मोरे आणि सचिन दिनकर आदींसह अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात