-
उत्तरप्रदेश दुसरा काश्मीर होण्याच्या वाटेवर !
-
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा अहवाल
कैरानामधून हिंदूंचे पलायन होत असतांना काहीही करू न शकणार्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हे अपयशच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली – राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार उत्तरप्रदेशच्या कैरानामध्ये धर्मांधांच्या भीतीमुळे हिंदूंनी पलायन केले आहे. तसेच या प्रकरणी कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, याचे कारण स्पष्ट करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारला निर्देश दिले आहेत. (समाजवादी पक्षाच्या राज्यातील हिंदूंच्या या दुःस्थितीविषयी एकही निधर्मीवादी किंवा पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे तोंड उघडणार नाहीत; मात्र अशी स्थिती अल्पसंख्यांकांची झाली असती, तर एव्हाना या सर्वांनी आक्रोश केला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. वर्ष २०१३ मध्ये राज्यातील मुझफ्फरनगर येथील दंगलीनंतर कैरानामध्ये २५ ते ३० सहस्र मुसलमानांचे पुनर्वसन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अहवालात म्हटले की, हिंदूंच्या पलायनामागे हेच एक मोठे कारण आहे. (मुसलमानांचे पुनर्वसन करण्यासाठी हिंदूंना निर्वासित करण्याचा अधिकार कुणाला आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. यावर्षी जूनमध्ये भाजपचे स्थानिक खासदार हुकुम सिंह यांनी पलायन केलेल्या ३४६ हिंदूंची सूची सार्वजनिक केली होती. त्यामागे धर्मांधांकडून भीती आणि खंडणी उकळणे ही कारणे दिली होती.
३. हुकुम सिंह यांच्या माहितीनंतर शामली जिल्हा प्रशासनाने म्हटले होते की, खंडणी उकळण्याच्या प्रकरणी केवळ ३ जणांनीच कैरानामधून पलायन केले होते. तसेच ज्या ३४६ लोकांची सूची देण्यात आली होती, त्यातील १६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७ जणांची नावे खोटी होती. याव्यतिरिक्त २७ जण अद्यापही कैरानामध्ये रहात आहेत, तर १७९ जणांनी ४-५ वर्षांपूर्वीच, तर ६७ जणांनी १० वर्षांपूर्वीच कैराना सोडले होते. (हिंदूंना त्यांचे जन्मस्थान सोडून का जावे लागते ? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडून हवे आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मात्र त्याच्या अहवालात म्हटले की, २०१३ मध्ये पुनर्वसन करण्यात आलेल्या २५-३० सहस्र मुसलमानांमुळे येथील लोकसंख्येची टक्केवारी पालटली आणि मुसलमान बहुसंख्य झाले. येथील सामाजिक स्थितीत पालट झाला आणि कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वाईट होत गेली.
५. अहवालानुसार २४ जणांनी दिलेल्या साक्षीत म्हटले आहे की, मुसलमान युवक हिंदु मुलींची छेडछाड करत होते. त्यामुळे महिलांनी घरातून बाहेर पडणे सोडले होते. तसेच या महिलांमध्ये इतके धाडस नव्हते की, या मुसलमान युवकांची पोलीस ठाण्यात तक्रार करावी. लोकांच्या म्हणण्यानुसार हिंदूंच्या पलायनामागे हेही एक मुख्य कारण आहे. (महिलांच्या समानतेसाठी प्रसिद्धीलोलुप आंदोलने करणार्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या संघटना येथील महिलांच्या सुरक्षेसाठी काही करणार आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
६. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्यांचा अहवाल उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना पाठवला आहे. तसेच त्यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी सरकारने कोणती कारवाई केली, याची माहिती २ महिन्यांत देण्याचा आदेश दिला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात