Menu Close

पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करा : हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीसनी लियोनकडून तेलंगणामधील करीमनगर आणि इंदूर येथे प्रशासनाला निवेदन !

deport_sunny

करीमनगर (तेलंगण) : हिंदु जनजागृती समितीकडून करीमनगरचे प्रशासकीय अधिकारी वीर ब्रह्मय्या यांना ३ विषयांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यात सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा पोलिसांकडून होणारा छळ रोखणे, पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करणे आणि पंजाब गोरक्षादलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान यांना पोलिसांनी अयोग्य पद्धतीने अटक केली असून त्यांचा सुटका केली जावी, या मागण्यांचा समावेश होता.

sunny_nivedan320

निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. सत्यनारायण चारी, आर्य समाजाचे शहर अध्यक्ष सूर्य प्रकाश राव उपस्थित होते. याच प्रमाणे इंदूर (निझामाबाद) येथे जिल्हाधिकार्‍यांना याच मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. नेला तुकाराम आणि श्री. शरत चंद्रा उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *