Menu Close

विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेवर खोटे आरोप करू नका ! – पू. ईश्‍वरबुवा रामदासी

तासगाव येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन

tasgaon_rha
मार्गदर्शन करतांना पू. ईश्‍वरबुवा रामदासी

तासगाव : सनातन संस्था आज विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करत आहे. संस्थेवर खोटे आरोप करू नका. त्याचप्रकारे डॉ. तावडे आणि श्री. समीर गायकवाड या निष्पाप साधकांना त्रास देऊ नका आणि सनातनच्या साधकांचा छळ थांबवा, असे मार्गदर्शन भाळवणी (विटा) येथील पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य पू. दादा महाराज यांनी केले. ते येथील बागणे चौक येथे आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित घुले, श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री हैबतराव पाटील, ऋषिकेश पेटकर, सिद्धेश्‍वर लांब, माळी समाजाचे श्री. राजेंद्र माळी, भाजप सौ. आशाताई पोतदार यांच्यासह ५० हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते.

या वेळी श्री. अभिजित घुले म्हणाले, हिंदूंच्या सणांवर पोलिसांची लगेच कारवाई होते; मात्र प्रार्थनास्थळांवरील भोग्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत. अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळीही कारवाई होत नाही. आम्ही पाकिस्तानात रहातो कि काय, असे वाटते. हिंदुत्ववादी शासन येऊनही हिंदुत्ववाद्यांवर खोटे गुन्हे प्रविष्ट होत आहेत. हा अन्याय तात्काळ थांबवावा. या वेळी श्री. संतोष देसाई आणि कु. प्रतिभा तावरे यांनी मनोगत व्यक्त केले. गुरुवारी बाजाराचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी थांबून विषय ऐकला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *