Menu Close

तमिळनाडूमध्ये हिंदु मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) सदस्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

  • पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या हत्या झाल्या किंवा त्यांच्यावर आक्रमणे झाली, तर आकाश-पाताळ एक केले जाते; मात्र हिंदूंच्या नेत्यांवर आक्रमणे झाली, त्यांच्या हत्या झाल्या, तरी त्याची कोणीच दखल घेत नाही !

  • तमिळनाडूतील असुरक्षित हिंदुत्वनिष्ठ नेते ! – सम्पादक, दैनिक सनातन प्रभात

jihadi

मदुराई – तमिळनाडूच्या दिंडीगल जिल्ह्यातील हिंदु मुन्नानीचे (हिंदू आघाडीचे) सदस्य श्री. शंकर गणेश यांच्यावर १९ सप्टेंबरला रात्री काही धर्मांधांनी धारदार हत्यारांनी आक्रमण केले. या आक्रमणात शंकर गणेश हे गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना दिंडीगल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी मदुराई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तमिळनाडूमध्ये हिंदु नेत्यांवर आक्रमण करण्याची अलीकडील दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी विश्‍व हिंदु परिषदेच्या होसूर शाखेचे सचिव आर्. सुरी यांची धर्मांधांनी हत्या केली होती. तसेच हिंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांची चारचाकी जाळण्यात आली होती.

१. श्री. शंकर गणेश त्यांची दुचाकी रस्त्यावर उभी करून त्यांच्या मित्राच्या दुकानाकडे जात असतांना त्यांच्या मागावर असलेल्या टोळीने त्यांच्यावर आक्रमण केले आणि नंतर तेथून पळ काढला.

२. श्री. शंकर गणेश यांच्यावर आक्रमण झाल्याचे वृत्त समजताच हिंदु मुन्नानीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली. हिंदु मुन्नानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी निषेधमोर्चा काढला. त्यांनी काही काळ रस्ता अडवला आणि दगडफेकही केली. पोलिसांनी हिंदु मुन्नानीच्या अनुमाने १०० कार्यकर्त्यांना अटक केली.

३. तमिळनाडूमधील हिंदु मक्कल कत्छीने निषेधमोर्चा काढून हिंदूंवरील आक्रमणांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *