Menu Close

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहीम !

ganesh_utsav_thane
महिलांना मार्गदर्शन करतांना सौ. उमा कदम

१. ठाणे येथे अनेक ठिकाणी गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले. शाळेत केलेल्या प्रबोधनाचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

२. कल्याण येथे केलेली सर्वच मार्गदर्शने आवडल्याचे अनेक भाविकांनी कळवले. येथे दोन ठिकाणी प्रवचनाच्या वेळी विषय मांडणार्‍या साधकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

३. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये गणेशोत्सवानिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी समितीच्या सौ. उमा कदम यांनी मार्गदर्शन केले. ४० महिलांनी याचा लाभ घेतला. या वेळी लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी बाजार विभागाचे बाजार अधीक्षक प्रमोद परमार, अग्नीशमन विभागाचे श्री. आर्.बी. पाटील, संगणक प्रमुख श्री. सुहास सावंत, सामान्य प्रशासन विभागाच्या कनिष्ठ लिपिक सौ. सीमा सावंत आणि सौ. रश्मी पार्डीकर, बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपिक सौ. स्नेहा धुले, घरपट्टी विभागाचे कर निरीक्षक श्री. अर्जुन पाटील, छाया रुग्णालयाच्या अधिकारी डॉ. (सौ.) शुभांगी वडेकर या सर्वांनीच सहकार्य केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *